prabodhini news logo
Home आर्थिक जनकापूर तुकूम येथे अपंग महिलेस आमदार मा.विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत

जनकापूर तुकूम येथे अपंग महिलेस आमदार मा.विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत

0
136

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

दिनांक ११ जानेवारी २०२४ ला राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मा. विजय वडेट्टीवार यांचेकडून श्रीमती तानाबाई पत्रुजी सिडाम वय ५५ वर्षे रा.जनकापूर तुकूम सदर महिलेस आर्थिक मदत करण्यात आली.

सदर महिला ही दोन्ही पायांनी अपंग असून, घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे,त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाहिजे असल्याची माहिती तालुकाध्यक्ष नितीन गोहने यांना मिळताच, त्यांनी आमदार मा.विजय वडेट्टीवार यांच्याकडून सदर महिलेस आर्थिक मदत मिळवून दिली.आर्थिक मदत देताना युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष वैभव गुज्जनवार,ग्रामपंचायत सदस्य हेमराज धुर्वे,केवलराम मडावी,महिला काँग्रेस कार्यकर्त्या लताबाई करकाडे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here