prabodhini news logo
Home चंद्रपूर गुंजेवाही जि. प. हायस्कूल, येथे आनंद मेळाव्याचे आयोजन

गुंजेवाही जि. प. हायस्कूल, येथे आनंद मेळाव्याचे आयोजन

0
161

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सिंदेवाही तालुक्यातील जि. प. हायस्कूल गुंजेवाही येथे शनिवार दि. 11.01.2025 ला आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. “खरी कमाई” या उपप्रमातंर्गत विद्यार्थ्यांच्या आंनदान भर टाकण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून बाल आनंद मेळावा साजरा केला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर, व्यावहारिक, अर्थिक बाबीची जाण व्हावी, समाजाचे ज्ञान व्हावी, व्यवहार ज्ञान व्हावे, यासाठी जि. प. हायस्कूल, गुंजेवाही शाळेने शालेय विद्यार्थाच्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्‌यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आणलेल्या सर्व खाद्य पदार्थांची गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात खरेदी केली व खाद्य पदार्थाची विक्री झाल्याने चिमुकल्यांच्या चेल्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात येतो. यावेळी बाल आनंद मेळाव्याचे उद्‌घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम मोहुर्ले, उपाध्यक्ष विश्रांती पेन्दाम, मुख्याध्यापक विनोद कोवे, शिक्षिक डा.प्रेमराज खोब्रागडे, बंडू गायकवाड, महेंद्र नागदेवते, प्रशांत खोब्रागडे, सुरेश सोनटक्के,देवचंद रामटेके, कु. सुखदेवे मॅडम, लक्ष्मण जराते, दौलत लेनगुरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here