
समतेचा यलगार उदगीर येथून आजपासून सुरुवात
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – “थिएटर ऑफ रेलेवन्स” शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटक “लोक-शास्त्र सावित्री” आज 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथे ७५० हून अधिक (हाऊसफुल्ल) प्रेक्षकांच्या सहभाग आणि साक्षीने प्रस्तुत झाला !
समता बंधुता आणि न्यायाच्या संकल्पाने जगण्याची,अर्ध्या जगताची चेतना नाटक “लोक-शास्त्र सावित्रीने” पेटवली आणि उदगीर मध्ये थिएटर ऑफ रेलेवन्स आणि कारवाँ फाऊंडेशन ने “संविधान संवर्धन नाट्यजागरचा” इतिहास घडवला.

आता “संविधान संवर्धन नाट्य जागराची” दुसरी प्रस्तुती
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, शनिवारी २५ जानेवारी २०२५, सायंकाळी ५.३० वाजता, पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध, पुणे येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “गोधडी” या नाटकाने थिएटर ऑफ रेलेवन्स – संविधान संवर्धन नाट्य जागराची सुरुवात होणार आहे.
“संविधान संवर्धन नाट्यजागर” – संपूर्ण राज्यभर, देशभर नाटकांची प्रस्तुती करण्यासाठी आम्ही रंगकर्मी सज्ज झालो आहोत.














