तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583 – ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला.
ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (२२ रा. मालेगाव जि.नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.
अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.
दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४०(१),६५ (१) भारतीय न्याय संहिता,सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे.आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले.

