prabodhini news logo
Home चंद्रपूर लोकमत सखी मंच तर्फे कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान या पुरस्काराने चंदा वैरागडे...

लोकमत सखी मंच तर्फे कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान या पुरस्काराने चंदा वैरागडे सन्मानीत

0
283

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दरवर्षी लोकमत सखी मंच तर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून प्रेरणा देण्याचे कार्य करीत असतात.
यावर्षीसुद्धा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला या कर्तृत्ववान महिलांमध्ये शुन्यातून विश्व निर्माण कलेल्या बाबूपेठ महिला बचत गट च्या संस्थापक अध्यक्ष तथा रणरागिणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष चंदा मनोजराव वैरागडे यांचा कर्तृत्ववान महिलांचा, स्त्री शक्तीचा सन्मान सोहळात सन्मान करण्यात आला.

चंदा वैरागडे यांनी केवळ 5, ते 10 महिलांना सोबत घेऊन एक छोटासा बचत गट स्थापन करून समाज कार्याला सुरुवात केली,बघता बघता त्या छोट्याश्या रोपट्याच वटवृक्षात कधी रूपांतर झाल हे कळलंच नाही,त्यांच्या प्रामाणिक व्यवहार,शांत स्वभाव ,सर्वाना सोबत घेऊन चालणे आणि महिलांना आर्थिक अडचणीत बचत गटाच्या माध्यमातून सहकार्य करणे, महिलांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा आत्मविश्वास वाढवून आत्मनिर्भय करणे ,या त्यांच्या निस्वार्थी उत्कृष्ठ सामाजिक कार्यामुळे त्या चंद्रपूरात नावारूपाला आल्या,आजच्या घडीला असंख्य महिला बचत गटात आहे, महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती ,परंतु बचत गटाची संख्या मर्यादित असल्यामुळे त्यांना गटात सहभागी करता येत नव्हतं,त्यामुळे त्या महिलांना कुठेतरी आपल्याला न्याय द्यावाच लागेल हे ध्येय उराशी बाळगुण बचत गटाची महिला पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला,आणि लगेच कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रात पहिली बचतगटाच्या माध्यमातून पतसंस्था स्थापन केली,विशेष म्हणजे हे सर्व कार्य त्यांनी स्वकर्तुत्वाने, स्वयंप्रेरणेने बचत गटातील महिलांच्या ,तसेच पतीच्या सहकार्याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here