prabodhini news logo
Home अमरावती प्रवासी नागरिकांना भंगार बसला मारावा लागतो धक्का..

प्रवासी नागरिकांना भंगार बसला मारावा लागतो धक्का..

0
199

चांदूर बाजार बस डेपो च्या बसेसला प्लेट वर बसला मारावा लागतो धक्का?

आचल कोरपे प्रबोधिनी न्युज – दिनांक :- 19 जानेवारी चांदूर बाजार येथील बस्थानंक मधील बसेस बऱ्याच वर्षांपासून भंगार झाल्या असून सुद्धा नवीन बसेसची आवश्यकता असून सुद्धा नवीन बसेस उपलब्ध नाही जुन्या बसेस कधी चालत असतांना अचानक बंद पड़तात व नागरीकांना बऱ्याच दूर पर्यंत चालत जावे लागते काहींना येणाऱ्या बसची वाट पहावी लागते बसेस डेली तालुक्यातुन कुठे ना कुठे बंद पडतात या कडे मात्र दुर्लक्ष केल्या जात आहे व यांचा त्रास प्रवासी नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. असाच प्रकार आज चांदूर बाजार बस डेपो मध्ये घडला असून चक्क प्रवाशांचा बसला धक्का मारावा लागला प्रवासी बिचारे बसला धक्का मारत आहेत कारण त्यामध्ये काही शाळेचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे शाळेच्या मुलांच्या पासेस असतात तर ज्येष्ठ नागरिक यांना मोफत बस सेवा असते. त्यामुळे नाईलाजाने त्या प्रवाश्यांना बसला धक्का ध्यावे लागते नागरिक अश्या नादुरुस्त बस मुळे बसचा प्रवास

सुद्धा टाळतांना दिसत आहे. चांदूर बाजार डेपोला केव्हा नवीन बसेस उपलब्ध होणार या प्रतिक्षेत तालुक्यातील बस प्रवासी नागरिक आशा वर आहे.
तसेच असदपूर परतवाडा येथे येनार्‍या लाल परी बस त्या सूध्दा भंगार झाल्या असून त्याचे गेट एवम डाॅईवर डोर याटोमॅटीक उघाडतात अशा प्रकारे कोणतीही घटना घडू शकतो या लाल परी बस ची रिपेरिंग सूध्दा शासण करत नाही या सर्वात असर विध्यार्थी वर होत आहे कधी दूरस्ती लाल परी ला करण्यार अशी नागरिकांना प्रश्र पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here