“आमदार विजय वडेट्टीवारांच्या मदतीने परतीचा मार्ग मोकळा..
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
कर्नाटक राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डाॅ.नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली. सदरची बाब ह्या तिन्ही काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले.
कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा.गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा.मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा.खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा.गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा.नवरगाव, निशा मेश्राम रा.पाडरवाणी यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

