prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीटर के. वाय. सी. आणि स्मार्ट मीटर बसवण्यास भीम आर्मी चा विरोध

मीटर के. वाय. सी. आणि स्मार्ट मीटर बसवण्यास भीम आर्मी चा विरोध

0
112

रेणापूर प्रतिनीधी लक्ष्मण कांबळे – सद्या सरकारणे विद्युत वितरण प्रणाली मध्ये स्मार्ट विद्युत मिटर बसविण्यासाठी के.वाय.सी. (KYC) चे काम खाजगी कंपणी तर्फे रोजंदारी व मानसे नेमुन काही भागात सुरू केले असून त्यानंतर विज ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसवीण्यात येणार असून, त्याचे बील प्रिपेड अदा.करायचे असणार आहे. या साठी भीम आर्मी रेणापूर तालुका अध्यक्ष अजय कांबळे यांनी विरोध केला आहे. कारण ग्रामिण भागातील बहुतेक जनता हि गोर गरीब व मजुर असून यांना अगोदर विज़ बिल भरुण’ करुन नंतर त्याचा वापर करणे परवडणार नाही. तसंच स्मार्ट मिटर बसविण्याच्या नावाखाली एम.एस.ई.बी. चे खाजगीकरण करण्याचा डाव आहे.
रेणापूर भागात हे काम सुरू केल्यास भीम आर्मी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येतील..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here