जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 – मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय व अभिनव बालविकास मंदिर वरखेडा विद्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजनांचे कैवारी राजाधिराज अवघ्या महाराष्ट्राला मुघलशाही, आदिलशाहीच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे अवघ्या हिंदुस्तानचे दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक नितीन भामरे सर होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ वरखेडा गावचे, जगदीश वडजे आंबेवनी ,ज्येष्ठ व्यक्तिमत्व चिंधु आप्पा तडाखे प्रकाश बोरसे ज्येष्ठ शिक्षक रामदास महाले संजीव पठाडे सोमनाथ शिंदे साधना माळेकर सीमा गायकवाड सरिता कांगणे संजय जाधव श्याम बोराडे,अभिनव चे मुख्याध्यापक मनोज गायकवाड धनश्री देशमुख योगिता जाधव कल्याणी जाधव सोनाली मौले प्रयोगशाळा सहाय्यक प्रवीण मोरे,शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश मोरे प्रमोद जाधव संतोष पवार संतोष गांगुर्डे, रोशनी गायकवाड कामिनी पवार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पूजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी अभिनव बालविकास मधील सौम्या तडाखे,स्वरा सवंद्रे तर विद्यालयातील श्रेया पडोळ सृष्टी, उफाडे संपत्ती जाधव तसेच इयत्ता 8 वी क च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा उत्तम गाऊन सादर केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या महाराष्ट्राला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढले,मुघलशाही आदिलशाही यांना शह देत महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले.असे आपल्या मनोगतातून विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र ठेपणे यांनी सांगितले.
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.शेतकरी कष्टकरी गरीब रयतेवर जुलूम करणाऱ्यांचा बंदोबस्त केला. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने निर्माण झाले असे विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक नितीन भांबरे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. विद्यालयातील छत्रपती शिवाजी यांच्या कार्याविषयी माहिती सांगणाऱ्या त्याचप्रमाणे पोवाडा सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वरखेडा गावचे भूमिपुत्र वरखेडा गावचे आंतरराष्ट्रीय धावपटू सिकंदर तडाखे यांचे वडील चिंधु आप्पा तडाखे यांनी 2,000 रुपये बक्षीस रूपात रोख स्वरूपात देण्यात आले.
शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त अभिनव व विद्यालयातील विविध विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली,तेच कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका गायत्री पवार यांनी तर आभार उपशिक्षिका सविता भोये यांनी मानले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

