
विकलांग सेवा संस्था उपक्रम
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर – राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्याने स्थानिक विकलांग सेवा संस्थेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच तुळशीनगर परिसरात स्वच्छ परिसरासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या युवा सुरेश येरगुडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्था सचिव मा. देवराव कोंडेकर यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र मार्गदर्शिका नंदा बिहाडे, अशोक खाडे, सुनंदा पान्हेरकर उपस्थित होते तसेच यावेळी स्वयंसिद्धा महिला बचत गट समूहाद्वारा सौं पूजा पान्हेरकर व इतरांद्वारा ‘शेवया निर्मिती ‘गृहउद्योग शुभारंभ करण्यात आला.

शिवाजी महाराजाचे जयंती पित्यर्थ शिवभोजन लाभार्थी व इतरांना मुंबईकर महानिर्मिती कम्पनी गुणवन्त कामगार नितीन मुरली राव द्वारा मिठाई वितरण करण्यात आले.
कार्यक्रम संपन्न करण्यासाठी राजश्री शिंदे, सोनू दुपारे इत्यादीनी मौलिक सहकार्य दिले.














