prabodhini news logo
Home चंद्रपूर सामाजिक कार्यकर्त्यां तथा सुविधा मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आणि जिल्हा महिला संपादिका,सुविद्या...

सामाजिक कार्यकर्त्यां तथा सुविधा मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आणि जिल्हा महिला संपादिका,सुविद्या बांबोडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

0
73

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका चंद्रपूर – सुविधा मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्यां, पत्रकार यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सन्मान विदर्भीय नवनाथ ट्रस्ट द्वारे प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार सईताई डहाके, आमदार हरीश पिंपळे, पूनम पवार स्वागताध्यक्ष निलेश सोमाणी, स्वागताध्यक्ष गिरीलाल सारडा, संजय कडोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा कारंजा लाड इथे पार पडला.
सुविद्या बांबोडे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.2006 ला आरोग्यविषयक शिबिर राबविले. चंद्रपूर बचाव संघर्ष समिती च्या संघटन सचिव म्हणून काम करीत आहेत. मनपा तर्फे राबविण्यात आलेल्या ओपन स्पेस सुंदर माझे उद्यान यामध्ये भाग घेउन प्रथम क्रमांक 11 लाखांचे पारितोषिक मिळविले. पर्यावरण संवर्धन विकास समिती च्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.गावाकडची बातमी, गावसहेली महाराष्ट्र संचालिका म्हणून कार्य पार पाडले. महिलांच्या अन्यायाबाबत प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. पुष्प लोक अहिल्याबाई होळकर नागपूर यांच्या हस्ते अहील्याबई होळकर सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . राष्ट्रीय सैनिक संस्था च्या सदस्या.. अंतरराष्ट्रीय मानवाधिकार येथे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत. ईनरव्हिल क्लब तर्फे सन्मान करण्यात आला. आर्थिक रित्या कमकुवत विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता करून दिली. सुविद्या बांबोडे यांना मिळालेल्या ह्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here