आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राजश्री जाधव यांना आदर्श कवयित्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

0
98

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आधार सोशल फाउंडेशन बेळगाव, कर्नाटक महाराष्ट्र गोवा यांच्या वतीने एक्सलन्स गोल्ड स्टार अवार्डचे नियोजन दि 16 रोजी कोल्हापूर येथे एट्रीया हॉटेल हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.
सौ राजश्री संजय जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत‌ आहेत. अनेक गरजु लोकांना नेहमी मदत करत असतात. अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदत करत असतात. अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करत असत. तसेच अनेक विषयांवर कविता अनेक वर्षांपासून लिहीत आहेत. 300 हुन अधिक कविता, चारोळ्या त्यांनी लिहिलेले आहेत. तसेच अनेक कवी संमेलन, साहित्य संमेलन यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राजश्री जाधव यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह कोल्हापूरी फेटा मेडल पेन देऊन प्रा डॉ पांडुरंग पाटील चेअरमन शिक्षक पतसंस्था गडहिंग्लज, प्रसिद्ध व्याख्याते, डॉ प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते, लेखक,कवी, डॉ दुर्गाप्पा पवार निर्वुत प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे अशा अनेक थोर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here