
मनाचा कोपरा एवढा छोटा
पण शरीराचे अवयवाचा म्हणे
आहे तो गुरु त्याच्या विना काही
करू शकत नाही मनाचे हेच देणे
मना एवढा हलकं दुसरं काही नाही
जातो कुठेही प्रवासात त्यालानाही विराम
वेळच नाही दिवसभर तर करतो काम
आणि झोपेतही म्हणे तो नाही करत आराम
मनाच्या घरट्यात सुबक अशा
आकृत्या कधी पुसट होतात
कधी ताज्या काय म्हणाव मनाला
मनच कधी करता दूर आणि जवळ येतात
द्यानाच महत्त्व मनाला फार
मने ध्यान केलं तर विचारात बहार
मनाला नेऊ ध्यानाच्या अधानी
मनात बनउ ध्यानाचे विहार
रंजना भैसारे
नागपूर















