
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वैनगंगा नदीपात्रातच करण्यात आले असून, जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
या वेळी उपस्थित आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की, “गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात प्रशासन वारंवार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेती, जनावरांचे पाणी व नागरिकांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होत आहे. ही प्रशासनाची उदासीन वृत्ती असून, लोकांच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही लढा देत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “जर प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
या आंदोलनाला उपस्थित काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता तथा आमदार मा.विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रा चे खासदार मा.डॉ नामदेव किरसान, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस कमिटी महिला जिल्हाध्यक्ष ॲड.कविता मोहरकर, माजी जिल्हा प.उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल,काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम ,काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले,काँग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे तसेच स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, नदीपात्रात उतरून कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला














