दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर रुग्णहक्क परिषदेचे हल्लाबोल आंदोलन

0
116

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, पुणे – पुणे दि. ०५- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मुर्दाबाद, घैसास – केळकरचे करायचे काय – खाली डोकं वर पाय! तनिषा भिसेला न्याय मिळालाच पाहिजे अश्या घोषणा देत आज लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्टचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर रुग्ण हक्क परीषदेने तीव्र निदर्शने करीत आज हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे- साठ्ये, सल्लगार अनिल हातागळे, प्रताप होळीकर, राजाभाऊ गायकवाड, फारुख सोलापुरे, रेखा वाघमारे, प्रभा अवलेलू, राहुल नागटिळक, रिपब्लिकन ग्राहक परिषदेचे किरण गायकवाड, प्रज्ञा कांबळे, रेशमाताई जांभळे, डॉ. रोहित बोरकर, धनाजी येळकर पाटील, सत्यवान गायकवाड, अमृता जाधव, लोक जनशक्ती पार्टीचे के.सी. पवार, राहुल उभे, सतीश साठ्ये, उमर शेख यांच्यासह रुग्ण हक्क परिषदेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्त यांना तातडीने आदेश देऊन लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्ट तात्काळ बरखास्त करावी. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ससूनच्या धर्तीवर सेवा पुरवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मृत्युमुखी पडलेल्या तनिषा भिसे यांना दहा करोड रुपयांची भरपाई द्यावी. नवजात दोन्ही बालकांवरील उपचार संपूर्णपणे मोफत करण्यात यावेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. सर्वच धर्मदाय रुग्णालये शासनाने ताब्यात घ्यावीत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर ईडी तर्फे चौकशी करावी. ट्रस्टची सर्व बँकिंग खाती ताब्यात घेऊन बेकायदेशीर आर्थिक घोटाळ्याची चौकशी करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here