प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परंडा-महाविद्यालयीन कॉलेजच्या परिक्षा जवळ आल्याने घेण्यात आलेल्या निरोप समारंभा वेळी भाषण करीत असताना अंतीम वर्षात शिकत असलेल्या वर्षा खरात वयवर्षे २० या युवतीचा दि.४ रोजी दुर्दैवी मृत्यू.धाराशिव जिल्यातील परंडा येथे ही दुर्दैवी घटना घडली.
वर्षा खरात ही युवती वय वर्षे २० परंडा येथे असलेल्या रागे शिंदे महाविद्यालयात बी एस सी अंतीम वर्षात शिकत होती. महाविद्यालयीन परिक्षा तोडावर आल्याने विद्यार्थ्याना निरोप देण्यासाठी महाविघालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाषण करतना वर्षा खरात वय वर्ष २० हि आपल्या महाविद्यालयीन तिन वर्षाच्या आठवणींना उजाळा देत असताना भाऊक झाली यावेळी तिला भोवळ आली. आणि ती जमीनीवर कोसळली तिला उपचारासाठी दवाखान्यात नेहले असाता वर्षा खरात हीस मृतघोषीत करण्यात आले.
वर्षाचे आईवडील हे शेतकरी असुन तिच्या पश्चात आईवडील, दोन बहीणी, एक भाऊ असा परिवार आहे.

