प्रशांत देशापांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती समारोह लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे भिम जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष राकेश मडामे, डॉ. अनिल भोरे, संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, प्राचार्य नरेंद्र गणविर, मार्कंड मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करून, प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते. यावेळी सामुहिक बौद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. सर्व भिम अनुयायांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले व एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषण, नृत्य, गीत गायन, चित्रकला मध्ये शुभ्रा सोमनाथे, मंजिरी भोरे, पुरव कुर्वे, ओवी मेश्राम, उर्वी मेश्राम, युवांश मेश्राम, जिशा आकरे, दिपाली भोरे, अमेया भैसारे, भव्यंम भैसारे, अंश बोरकर, स्नेहांश कान्हेकर, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे यांनी सहभाग घेतला. त्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आली.
कार्यक्रमास प्रा. डॉ. विजय गणविर, ऋषी गोस्वामी, नितेश धारगावे, नंदकिशोर भालाधरे, सुरेंद्र मेश्राम, प्रा. डॉ. रत्नपाल डोहणे, प्रा. डॉ. राजेंद्र प्रसाद पटले, प्रा. डॉ. मुरलीधर नाकाडे, प्रा. डॉ. सुभाष गोंडाणे, प्रा. डॉ. साधनाताई वाघाडे, आनंद धाडसे, शालिनीताई गाढवे, वर्षा गणविर, मृणाली कान्हेकर, अस्मिता धारगावे, रुपलता गणविर, अश्विनी भैसारे, सुजाता गोस्वामी, स्नेहलता मडामे, प्रभूदास निकोसे, चंदा लांजेवार, मंगला भोयर, स्वरा भोरे, अदिती धारगावे, आदित्य गणविर, सपना मेश्राम, अजिंक्य मेश्राम, प्रिन्सी भैसारे, अंश भैसारे, अंकुर गणविर, राखी रंगारी, चंदा लांजेवार, कमलेश उके, राकेश आकरे, बंडू बोरसरे, गोपिचंद वनवे, रामदास सिंगनजुडे, सुधाकर राऊत, प्रमोदिनी भालाधरे, अल्का सदावर्ते, डॉ. एस. डी. वाघाडे, दिपक मेश्राम, मंगेश मेश्राम, स्नेहा बांते, वनिता सार्वे, तुषार मने, रोहित मने, प्यारेलाल जांभूळकर, संतोष तांडेकर, सुनंदा सिंगनजुडे, अश्विनी कुर्वे, शामकला सोमनाथे, नजीर शेख सह नगरातील बौध्द उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व महिला समितीचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहुल भोरे यांनी केले.

