prabodhini news logo
Home ठळक बातम्या नवनित विद्यालयात भिम जयंती साजरी

नवनित विद्यालयात भिम जयंती साजरी

0
393

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्प वाहून प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाची उद्देशिका यांचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य नरेंद्र गणवीर यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे हिरालाल गजभिये, सुनिल नागदिवे, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. नानाजी गजभिये, प्रा. अरूण कांबळे, अशोक गजभिये, अनिरुध्द गजभिये, संजीव मेश्राम सह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुमिता गजभिये तर आभार निर्मला रंगारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here