सोळा शृंगारा मधील
एक दागिना पैंजण
शोभा वाढते पायाची
उत्साही राहाते मन….
चाळ , नुपूर, पैंजण
नाव अनेक तयाला
घालतात सर्व स्त्रिया
नाही बंधन वयाला….
वाटे मधूर आवाज
छुम छुम पैंजणाचा
लेकी बाळी घरामध्ये
वावरत असल्याचा……
आहे फारच महत्त्व
चांदिच्याच पैंजणाला
सकारात्मकता आणि
उर्जा मिळे शरीराला……..
पैंजणांचे असतात
वेग वेगळे प्रकार
जाड,पातळ पैंजण
नाना विविध आकार…..
तान्ह्या बाळाच्या पायात
चाळ छान शोभतात
दुडूदुडू धावताना
छूण छूण वाजतात…..
लोपामुद्रा शहारे
नागपूर

