प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काळजातिल हाक बाप

0
121

बाप दगडाची शिळ, लागे घनाचा घाव

उन्हा तहानाचा बाप, कसा सुकलाय जीव

जीव ओतून निघाला, जसा सुर्याचा उजेड

नशिबात बापाच्या कोसळली दरड

ओल्या दु:खाचं सावट कसा झेलतोय बाप

तळपत्या मातीत बाप सोसतोय धाप

सारं रान करपलं केलं घामाचं शिंपण

कोवळ्या रोपट्याचा प्राण वारं सुटलं उधान

ओल्या जखमांचा विस्तार, बाप घेतो अंगावर

नियतीला काय ठाऊक, बाप जीवाचा आधार

हाक काळजातून देई, बाप तुझी नवलाई

कसी विसरू मी, तुझ्या कष्टाची पुण्याई.

सौ. नुतन वाघमारे गायकवाड
लोणंद, जिल्हा सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here