ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचेकडे नितीन भटारकर यांची मागणी.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे राज्यातील मोठे विज प्रकल्प असुन येथील वसाहतीत किमान २ हजारांहून अधिक कर्मचारी व त्यांचे परिवार राहतात. या वसाहतीत सर्व प्रकारच्या सोई सूविधा आहे, मात्र जलतरण तलावाचा अभाव आहे. सदर प्रकल्प वसाहतीच्या १० कि. मी पर्यंत एकही जलतरण तलाव नसल्याने प्रकल्पातील उच्च अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांसह परिवारातील सदस्यांना ईच्छा असुनही स्विमींग करता येत नाही. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी यापुर्वी अनेकदा संबंधीतांना लेखी निवेदन दिले.
यापुर्वी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भाने मा. मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांनी पाठविलेल्या पत्रात जलतरण तलावाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते परंतु संबधित कामाला एम.ई.आर.सी. यांचेकडून मंजुरी मिळाली नाही असे सांगण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जिवणात शारिरिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न (फिटनेस) राहण्याचे सर्वांचे प्रयत्न राहते, त्याकरीता अनेक प्रकारचे व्यायाम देखील नागरीक करीत असतात. त्याच दृष्टीने दररोज पोहण्याने देखील मोठ्या प्रमाणात शारिरिक दृष्ट्या फायदा होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुविधेकरीता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने स्वतःच्या निधीतुन प्रकल्पाच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जागेत जलतरण तलावाला मंजुरी दयावी.
जेणेकरून वसाहतीतील नागरिकांना तसेच प्रकल्पाच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना देखील याचा फायदा होईल. व म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे जलतरण तलावाला मंजुरी देण्यात यावी या संदर्भात मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती, प्रकाशगड बांद्रा, मुंबई यांना निर्देश दयावी यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी राज्याच्या ऊर्जा मंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना भेटून निवेदन दिले. यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

