
प्रशांत रामटेके मुख्य संपादक – नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ, भारत यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय परिषद दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सभागृह दुसरा माळा, आमदर निवास, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झाली.
ही परिषद फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या अधिवक्त्यांची असून, समाज परिवर्तन व सामाजिक न्यायासाठी कार्यरत वकिलांचा एकत्रित संवाद आणि कृती कार्यक्रम होय.
या परिषदेसाठी मार्गदर्शक म्हणून मा. ॲड बी. एम. सिंह (राष्ट्रीय अध्यक्ष), मा. ॲड. लवलेश वर्मा (राष्ट्रीय सरचिटणीस), ॲड. शाकीर कुरेशी (राष्ट्रीय सहसंयोजक, छत्तीसगढ), ॲड. दिनेश धोबे, ॲड सिद्घार्थ गायकवाड, व ॲड . नरेंद्र गोंडाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. गुणवंत रामटेके असून, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ॲड राजकुमार बोंबार्डे (तीन वेळा माजी अध्यक्ष, डी बी ए गोंदिया) व मा. अंकुश वाघमारे (अंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता, चंद्रपूर) यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या परिषदेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांतील अधिवक्त्यांचा सहभाग होता, ॲड अस्मिता तिडके यांच्या संयोजनाखाली आयोजन केले आहे.

संघटनेचे उद्देश
न्यायपालिका तसेच ट्रिबुनल्स बँक, आयोग इति. मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वासाठी लढा देणे,
भारतीय बार कौन्सिल आणि राज्य बार कौन्सिलमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात बहुजन समाजातील वकिलांचे प्रतिनिधित्व करण्याचे तत्व अंमलात आणणे, बहुजन समाजाच्या कोणत्याही वकिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संघटनेने नेहमीच तत्पर असणे , अशा अनेक प्रश्नांवर संघटना काम करीत आहे. संघटना अशा अनेक समस्या आणि हक्कांसाठी काम करते आणि लढते.
आमचा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नाही तर संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड अस्मिता तिडके यांनी केले. सूत्रसंचालन ऍड प्रवीण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड संगीता मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड कंचन वराडे नागपूर जिल्हा संयोजक , अँड विजया बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ॲड तरुण परमार सर, ॲड रमेश राठोड सर, ॲड संतोष चव्हाण, योगिता रामटेके, ॲड ज्योती वालदे, प्रशिक आनंद उपस्थित होते.
कार्यक्रमाला सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.














