prabodhini news logo
Home गडचिरोली आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित यावे – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे आवाहन

आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित यावे – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे आवाहन

0
129

नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी नेत्यांनी राजकारण विसरावे व एकत्रित यावे….

तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक बा मिरालवार
8830554583

अहेरी – आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील रस्त्यावरील आणि पुलांच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक हैराण झाले असून, २६ एप्रिल २०२५ पर्यंत डांबरीकरण पूर्ण न झाल्यास २८ एप्रिलपासून चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात अपूर्ण पुलांमुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन केला होता, आणि यंदाही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदर रस्त्याचे काम केवळ संथच नाही, तर निकृष्ट दर्जाचे आहे. पुलांचे साचे महिनोनमहिने तसेच पडून आहेत. अपघातात जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण? विकासाच्या नावाखाली नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे. सदर रस्त्याच्या मागणीसाठी 28 एप्रिल पासून न होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण विसरून एकत्र यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here