प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गांधी विद्यालय, पहेला येथे सुरू असलेल्या उन्हाळी कला शिबिरात विविध उपक्रमांतर्गत पाककृतींचे प्रशिक्षण सत्र मोठ्या उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थ्यांना टमाटर सास व आंबा कॅन्डी, साखर आबा, आंबा सरबत पावडर या स्वादिष्ट व पोषक पदार्थांच्या कृती शिकवण्यात आल्या.कला शिबीर मध्ये पाककृती वर्गाला गांधी शिक्षण संस्था कोंढा अध्यक्ष मा. जिभकाटे तसेच त्यांच्या अर्धांगिनी मा. संजीवनी जिभकाटे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिबिराकरिता शुभेच्छा देऊन विद्यार्ध्याना संधीच सोन करा करा.व्यावसायिक शिक्षण खूप महत्वाचे आहे अश्या प्रकारे मत व्यक्त करून मार्गदर्शन केले.पाककला या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रशिक्षणासाठी विशेष निमंत्रित म्हणून प्रा. भुरे व करूणा कावडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ कृती शिकवूनच न थांबता, या पदार्थांचे आरोग्यावर होणारे फायदे व पोषणमूल्य देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी शंका विचारत सक्रिय सहभाग नोंदवला.
सत्राचे संयोजन कला शिबीर प्रमुख पुष्पा काटेखाये यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील सत्रांसाठी उत्साह व्यक्त केला.विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन काटेखाये यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यालयाचे पर्यवेक्षक विनोद हटवार,सर्व शिक्षक, शीक्षीका,आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले

