प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

0
101

खरच असतो का आपण..शिल्पकार…
घडवता येते का स्वतः च स्वतःला…????
सहज प्रश्न विचारला मीच मला

आपल आयुष्य इतकं साध सोपं आणि सरळ असतं का हो..
किती प्रश्न पडलेले असतात… त्यांची उत्तर शोधता शोधता.. आयुष्य कधी संपते कळत नाही. कधी सापडतात उत्तरे… तीही आपला कस काढणारी असतात. काय काय वाढून ठेवलेलं असत पुढ्यात आपल्याला कधी अंदाज येतो का.. माहित ही नसत आपल्याला उद्याचा दिवस कसा असेल…
अशा या नटरंगी जगाचा आपण एक भाग म्हणून जगत असतो.

असे जीवन जगत असताना कधी तरी अनेक जण डिप्रेशन मध्ये जातात.
त्यांच्याही नकळत ते एक दुहेरी आयुष्य जगत असतात.
मग शोध सुरू होतो. ते दुहेरी आयुष्य काय असत याचा, आपल्याही नकळत आपण त्याचा स्वीकार केलेला असतो. मग सुरू होते एक लढाई… स्वतः ची स्वतःशी.. आणि काय आहे ते जाणून घेण्यासाठी मग कधी आपण तर कधी आपले जवळचे लोक प्रयत्न करतात.

काय असत डिप्रेशन आणि ते का असत….आपल्याच मनाची दुसरी एक बाजू असते ती नको इतका खोल विचार करणारी… आपल्याही नकळत शांत अशा डोहात बुडवणारी…मग आपल्याला ही ती शांतता… निस्तब्धता हवीशी वाटणारी असते. मग कोणीही नको वाटते. एकटे पणा छान वाटतो. सगळ काही संपले आहे… आपले कुणी नाही असे भास होत असतात. आपल्याही नकळत आपण सगळ्यांना परके ठरवत असतो.
पण मग असे का होते…. का सगळ काही संपले आहे असे वाटते. नकळत एक द्वंद्व सुरू असते मनात..

अशावेळी आपण च आपली कैफियत मांडली पाहिजे.
आपल्याच मना समोर… आणि विचारायचे काही प्रश्न स्वतःला..कोणी मदत करेल की नाही याची वाट का पहावी. आणि ती मदत मिळाली तरी ती तशी खंबीर साथ देणारी असावी लागते.
माझे मत असे आहे की…
ती एक वेळ असते…. तो एक काळ असतो
ती आठवण असते… तो दुरावा असतो…
तो कमीपणा असतो… आपला आपण घेतलेला…
तो दुबळेपणा असतो मनाचा…. ते नैराश्य असते …

पण.. यावर मात करावी की नाही..तो आपला प्रश्न असतो…. कुणी साथ देईल.. हात देईन… हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो…. मग असे असेल तर… आपले कुणी असते का नसते ???
हाच विचार जर केला तर मग सगळी उत्तर तुमची आहेत की.. ..
जर उत्तर आहेत तर मग तुम्ही कसे एकटे एकाकी आहात…. कशाला हवी कुणाची साथ…
वाट पहात आहे तुझी उद्या ची पहाट…
तूच तुझी सोबत… अन् तूच तुझी रंगत…
अन् तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार…
तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार

लेखिका आशालता भोसले.
इंदापूर पुणे जिल्हा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here