किती हे वाढते तापमान
खूप सर्व झाले परेशान
लावा झाडे सगळीकडे
सूंदर होईल जीवनमान।।
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आज आपण पाहतच आहोत पृथ्वीचे खूप तापमान वाढलेले आहे आणि सर्व लोक सर्व जगच या तापमान वाढीने खूप परेशान झाले आहे. आणि असेच का पण वाढत राहिली तर एक दिवस पृथ्वीचा नक्की अंत होईल म्हणून ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे खूप गरजेचे आहे.
ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे तर थोडक्यात जागतिक तापमान वाढ होय तर तापमानात कशामुळे वाढ होते ते आपण जाणून घेऊया
1880 च्या दशकात औद्योगिकरणाला सुरुवात झाली त्यानंतर पृथ्वीवरील जनजीवन पूर्णपणे बदलून गेले ऊर्जा मिळवण्यासाठी आज आपण दगडी कोळसा तेल व गॅसवर निर्भर आहोत तुमच्या घरात असलेले विद्युत उपकरणे चालवण्यासाठी जी वीज बनते ती बहुतेक वेळा या कोळशापासून तयार होते.
प्रवासासाठी आपण कार, बस, विमाने ,जहाजे चालवण्यासाठी जैविक इंधनाचा वापर केला जातो जैविक इंधनासाठी तर संपत चाललेले आहेत मात्र हे इंधन जाळल्यामुळे पर्यावरणात गॅस मिसळतात त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे पृथ्वीचे वाढते तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग होय
गेल्या दीडशे वर्षात पृथ्वीच्या तापमानात एक पूर्णांक दोन अंश सेल्सिअस ने वाढ झालेली आहे. शास्त्रज्ञांच्या मते यावर नियंत्रण मिळवले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात कुठल्याही वायूमुळे तापमान वाढ होते जागतिक तापमान वाढ जैविक इंधन ज्याला इंग्रजीत हॉसेलफ्युलेस म्हणतात ते जाळल्यामुळे हवेत कार्बन डाय-ऑक्साइड मिथेन , नायट्रस ऑक्साईड, हायड्रोक्लोरो कार्बन, क्लोरोफ्लोरो कार्बन हवेत मिसळतात यांनाच ग्रीन हाऊस गॅस म्हटले जाते या वायूमुळे आपली पृथ्वी गरम राहते मात्र याची मात्र वाढली तर पृथ्वीचे संतुलन बिघडते.
आता अधिक तापमान वाढ हे पृथ्वीला विनाशाकडे घेऊन जात आहे
ग्लोबल वार्मिंग मुळे पृथ्वीवर काय परिणाम होतो वातावरण गरम झाल्याने जमीन आणि समुद्राचे पाणीही प्रमाणे अधिक तापत आहे त्यामुळे आर्टिक ध्रुवीय प्रदेशातील ग्लेशियर वितळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढली आहे पाहता समुद्रकिनारी असलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे थंड प्रदेशात बर्फ वृष्टी कमी झाली आहे आणि जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती तयार झाली आहे तर पर्वत भागात ढगफुटी सारख्या घटना घडून नदीला पूर येत आहे एवढेच नाही तर अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत जंगलात वनवा लागण्याचे प्रमाण हे वाढले आहे
ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी काय करावे लागेल आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचे असेल तर कार्बन डाय-ऑक्साइड नेट झिरो इमिशन म्हणजे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण तेवढेच ठेवायचे जेवढे पृथ्वीसाठी गरजेचे आहे साठी जुन्नर 50 पर्यंत डेडलाईन तयार करण्यात आली आहे जर तसे केले नाही तर तापमान 1.5°c वाढ होण्याची शक्यता आहे नेट झिरो इमिशन साठी काय करावे लागेल
जगभरात नवीन कोळसा प्लांट ऑइल प्लांट आणि गॅस फिल्डला मंजुरी दिली जाऊ नये 2025 पर्यंत गॅस आणि ऑइल फरनेस विक्री बंद करावी 2035
पर्यंत पेट्रोल डिझेल करणाऱ्या गाड्या बंद करावे 2050 पर्यंत हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या चालू कराव्यात श्रीमंत देशांनी पॉवर प्लांट्स वर झिरो कार्बनी मिशन लागू करावे तसेच जगातील सर्व देशांनी नेट झिरो इमिशनचे लक्ष साध्य करावे
जगाचे तापमान 1.5°c ने वाढल्यास काय होईल
शास्त्रज्ञांच्या मते जर तापमानावर नियंत्रण मिळवले नाही तर या शितकाचे शेवटपर्यंत मध्य अमेरिका दक्षिण आफ्रिका भूमध्य सागराच्या चारही भागाच्या देशामध्ये भीषण दुष्काळ पडेल अमेरिकेच्या टॅक्सेस पासून ते बांगलादेशाच्या जवळ असलेले सर्व बेट समुद्रात सामावतील अरब देशात उष्ण वारी वाहतील त्यामुळे घरातून बाहेर पडणे ही शक्य होणार नाही तर थंड प्रदेशात बर्फ वृष्टी होणारच नाही त्यामुळे पृथ्वीला वाचवणे गरजेचे आहे पृथ्वीवर सुरक्षित तर आपण सुरक्षित झाडे लावा आणि पृथ्वी वाचवा धन्यवाद..
लेखिका प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

