प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – शिल्पकारात शिल्प घडवितांना अतिशय मेहनत श्रम संघर्ष यांचा सामना करावा लागतो. त्याच्या कौशल्यातून उत्तम सुंदर मुर्ती घडविली जाते.
आपल जीवन देखील असेच आहे आयुष्यात अनेक चढउतार येतात अनेक संकट येतात त्यावर मात करून पुढे जावे लागते.
दिवस निघाला की नवीन कार्याला सुरुवात होते . ती सुरुवात चांगली झाली तरच आयुष्यात सामोर गेल्यासारखे वाटते . म्हणूनच म्हटले जाते की तुच तुझ्या जीवनाची शिल्पकार आहे.
जीवनाचा खरा अर्थ स्वतःला घडविण्यात आहे . नवरा बायको ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत . पण स्वतःला घडविण्यात जो आनंद आहे. तो व्यक्त करू शकत नाही . स्वतः ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. विविध प्रकारच्या विषयाची आवड होती. कविता करण्याची थोडस लेखन वाचन करण्याची आवड होती. नुसती आवड असून चालणार नाही त्यावर विचार करून स्वतःल सिद्ध करायल पाहिजे नव्हे केलाच पाहिजे असा विचार करून निर्णय घेतला सुरुवात केली. काही चुकल तर पुन्हा त्याचा विचार करायचा . अपयश आले तरी चालेल पण प्रयत्न करायचा .
म्हणतात ना तुझी तुच हो महिषा सुरमर्दिनी
तुझे तुच कर जतन
तरच होईल शान ए वतन
शान ए वतन .
लेखिका सौ. प्रतिभा वारेकर
स्वामीधाम रेसीडेन्सी घोगली नागपूर

