लहानपणी आई वडीलांनी केलेले संस्कार, त्यांची शिकवण, त्यांनी लावलेली शिस्त, त्यांचे प्रेम घेऊन मूल मोठे होते.शाळेत जाऊ लागते,तेव्हा शाळेतील शिक्षकांकडून शिक्षण आणि संस्कारही मुलांवर केले जात असतात.
मुलं इतर मुलांत तसेच समाजात वावरतात.
अवतीभोवतीच्या घडामोडी आणि समाज वर्तनाचाही मुलांवर परिणाम होत असतो.त्यांतील आपण काय घ्यायचं हे त्यांचं मन जाणीवपूर्वक तसेच अजाणताही घेत असतं.
पण आई वडील, आजी आजोबा,नातेवाईक, शिक्षक, पुस्तके, समाज यांच्या कडून जे मिळालेलं असतं त्यातून मुलं सुज्ञपणे निवड करून घेऊन आपले वर्तन चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
आपले भविष्य घडवण्याचा त्यांचा स्वतःचाही प्रयत्न स्वतःच्या वाढीसह सुरू असतो.
त्यातून योग्य ती निवड, यश, प्रगतीची योग्य वाटचाल आणि मोठ्यांची मदत योग्य मार्गदर्शन लाभले तर मुलं खूप पुढे जातात.
कित्येक मुलं शिक्षण, करियर,पुढे जाण्याचा मार्ग स्वतःच निवडून पुढे जातात.
म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, कि ‘तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार ‘ आहेस .
आई वडिलांकडून मदत ,मार्गदर्शन,पाठबळ मिळाले तरीही योग्य शिक्षण, करियर मिळवून जीवनात खूप पुढे तुलाच जायचे आहे बेटा.
सोबत कुणी असेल किंवा नसेल तरीही पुढे जायचा मार्ग एकट्यानेच आक्रंदून ( चालून) यश मिळवायचे आहे.
‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ आहेस.
यशस्वी होत रहा.
लेखिका डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे
ठाणे

