prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – तूच तुझा जीवनाचा शिल्पकार

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – तूच तुझा जीवनाचा शिल्पकार

0
134

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
महापुरूष तोचि हो थोर
संघर्ष करूनी
शिक्षण त्यांनी घेतले
बुध्दीवंतानं त्या
कायदयाचं राज्य आणले
संविधान हो लिहुनी
आमचा उध्दार करूनी गेले
आपल्या सार्‍यांचे
जीवन सुखकारक केले
दिन-दुबळ्याचे
जनसेवक ते झाले
समान न्याय,हक्कसाठी
सारे आयुष्य वेचले
ममतेच्या सावलीत वाढून
घेऊन शिकवण, देई स्वतःस आकार,
घडव स्वतःला तू तुझे
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
ममतेच्या सावलीत वाढुन
घेई धडे जीवन अनुभवाचे,
संघर्षाच्या खाच खळग्यातुन
पुढे पुढे चालत जाण्याचे.
यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यास
घडवे स्वतःस कष्टाने,
ममतेच्या छत्रछायेत राहून
करे स्वतःस तयार धैर्याने.
डाॅ.आंबेडकरांनी राष्ट्र हे घडवले
लोकशाहीसाठी अपार कष्ट केले
माझ्या देशाचे शिल्पकार
सारा देश असे त्यांचा कृतज्ञ !!!!

कवयित्री नुतन वाघमारे गायकवाड़
लोणंद सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here