prabodhini news logo
Home ठळक बातम्या न. प. माधोराव पटेल उच्च प्राथमिक (सेमी इंग्लिश) डिजिटल शाळा तुमसर येथील...

न. प. माधोराव पटेल उच्च प्राथमिक (सेमी इंग्लिश) डिजिटल शाळा तुमसर येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

0
185

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी सदर शाळेतील मुख्याध्यापक बी. पी. उपरीकर यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व शिक्षकवृंद प्रती भावना व्यक्त केल्या व ठिकाण बदलले तरी जिव्हाळा कमी होणार नाही असे मनोगत व्यक्त केले.शालेय कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन करतांना सर्वांनी आपापल्या कौशल्यानुसार भविष्यात यशस्वी व्हावे असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन पी.डी.बामण यांनी केले.तर आभार ललिता रेहेकवार यांनी मानले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, कॉन्व्हेन्ट टीचर, स्वयंसेविका, स्वयंपाकी बाई, पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here