प्रणय प्र बसेशंकर
तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़, चंद्रपूर
चंद्रपूर – बारामती,शरयू चषक राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २६ आणि २७ एप्रिल २०२५ रोजी महावीर भवन बारामती, येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शकील अन्सारी, तक्ष मून, परी तल्हार आणि स्वरा सुरनेर या चिमुकल्या खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने रोप्य पदके पटकावित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांमध्ये या चारही खेळाडूंनी ठसा उमठवला.
स्पर्धेमध्ये काता आणि कुंमीते या प्रकारांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
शकील, तक्ष, परी, आणि स्वराने कुमीते प्रकारात दमदार लढत देत पदके पटकावले.
संस्थेचे अध्यक्ष मान. संतोष रतन कडपेवाले व सचिव मोहित कुमार प्रेमलाल साहू यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

