prabodhini news logo
Home चंद्रपूर शिबिरातुन विद्यार्थ्यांना मिळाले जीवन शिक्षणाचे धडे – उपमुख्य अभियंता श्याम राठोड

शिबिरातुन विद्यार्थ्यांना मिळाले जीवन शिक्षणाचे धडे – उपमुख्य अभियंता श्याम राठोड

0
152

ऊर्जानगरात बाल संस्कार व जीवन शिक्षण शिबीराचा समारोप

सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : ग्रामगीतेवरील तत्वज्ञानावर आधारित बाल संस्कार व जीवन शिक्षण शिबिरातून शिबिरार्थ्यांनी जीवन शिक्षणाचे धडे घेऊन ज्ञान संपादन केले पाहिजे असे प्रतिपादन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता श्याम राठोड यांनी शिबिराच्या समारोपिय कार्यक्रम प्रसंगी केले. शिबीर सातत्याने आयोजित केल्याबद्दल ऊर्जानगर मंडळाचे अभिनंदन केले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने आयोजित
बालसंस्कार व जीवन शिक्षण शिबीराच्या समारोपाला उदघाटक म्हणून उपमुख्य अभियंता श्याम राठोड, अध्यक्ष स्थान अड्याळ टेकडीचे संचालक आदरणीय सुबोधदादा यांनी स्वीकारले होते .प्रमुख अतिथी अधिक्षक अभियंता दिलीप सराग व रविंद्र चौधरी, मंडळाचे अध्यक्ष रामदास तुमसरे, सबोर्डिंनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे केंद्रीय संयुक्त सचिव अभियंता नितीन काळे तथा डाँ बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम, ऊर्जानगरच्या सरपंच मंजुषा येरगुडे, अड्याळ टेकडीच्या सुश्री रेखाताई बुराडे, महिला अध्यक्षा सविताताई हेडाऊ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उदघाटक उपमुख्य अभियंता श्याम राठोड तथा उपस्थित अतिथी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन आणि श्री गुरुदेवाच्या अधिष्टानाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी तुकारामदादांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिबिरार्थांनी स्वागतगीत म्हणुन शब्दसुमनांनी स्वागत केले.
सर्व उपस्थित मान्यवराचे मंडळाच्या कार्यकत्यांनी पुष्पगुच्छ व ग्रामगीता ग्रंथ देवून स्वागत केले. अध्यक्ष रामदास तुमसरे यांनी प्रस्तावणेत सांगितले की, राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील वैज्ञानिक विचार समोर ठेवून जीवन चांगले व सुंदर बनविण्यासाठी, युवापिढीला सशक्त , निरोगी, स्वावलंबी, निर्व्यसनी, स्वाभिमानी व चरित्रवान बनविण्यासाठी शिबीराचे आयोजन केले होते .
या शिबिरात एकूण 56 मुलामुलींनी सहभाग घेतला होता. सर्व शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानित केला. उत्कृष्ठ शिबिरार्थीचे मानकरी चिं.ऋषिकेश निलेश धमाणे व कु. श्रुती देवेंद्र मेश्राम हे ठरले. ग्रामगीतेतील जीवन शिक्षण अध्यायावर आधारित लेखी परीक्षेत प्रथम कु. श्रुती देवेंद्र मेश्राम,द्वितीय कु.आकांक्षा पुराणचंद मेश्राम तर तृतीय वेदांत वाल्मीक गोठे तसेच तोंडी परीक्षा घेण्यात आली त्या प्रथम आभास रुपेश नंदनवार , द्वितीय कु. लावण्या पराग भोयर व तृतीय युधिष्ठिर संदीप ढगे यांनी पटकावला सर्वांना मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारंपारिक लाठी-काठीच्या कवायतीत सर्व लाठी-काठीच्या वारांचे व लाठीच्या चौमुखीचे व लाठी-लढतीच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने उपस्थित भारावून गेले. तलवार लढतीच्या प्रकाररात ढाल-तलवारचे व ढाल-तलवार लढतचे प्रात्यक्षिके मुला-मुलींनी सादर केली त्याला उपस्थितांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर समुहगीत सादर केले. अंगावर शहारे येईल असे भर्रा-बाना व डबल पट्टाचे सादरिकरण केले.यावेळी पालक व शिबिरार्थी यांचे मनोगत घेण्यात आले त्यात कु.लावण्या भोयर,प्रज्वल भेंडारे,सौरभ कस्तुरे,आदिती कांबळे, हिरण्या कांबळे,पराग भोयर ,बंडु वैद्य,राखी नगराळे यांनी सहभाग घेतला.
शिबिराचे मार्गदर्शक आत्मानुसंधान भु-वैंकुंठ अड्याळ टेकडी येथील संचालक सुबोधदादा तथा महिलाश्रमाच्या प्रमुख सुश्री रेखाताई बुराडे, प्रशिक्षक अक्षय कुडे, विशाल वैद्य,पराग खोकले व विशाखा काजरखाने,आरती दोनाडकर तसेच सहप्रशिक्षक निधी उरकुडे,ऋतुजा कोंडेकर,कीर्ती जोगी ,लोकेश जीवतोडे,पारस वाढणकर, प्रफुल भोयर ,सौरभ कस्तुरे यांनी शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात खैरगांव येथील स्वतंत्र युवा संस्थांच्या पदाधिकारी यांचा शिबिराला दिलेल्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेंद्र पोईनकर यांनी केले व आभार सचिव खेमदेव कन्नमवार यांनी मानले. शेवटी सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here