
ब्रम्हपुरी गावठाण मोजणीच्या मागणीस शिवसेना तालुका व शहर यांचा इशारा ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना मालकी हक्काचे दस्तऐवज द्यावेत:-नरेंद्र नरड
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आदेशाने,माननीय आमदार डॉ. मनीषा कायंदे शिवसेना सचिव, मा. किरण पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, मा. किशोर राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, बंडूभाऊ हजारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या आदेशानुसार ब्रम्हपुरी शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे अचूक मोजणी करून नागरिकांना आखीव पत्रिका देण्याची मागणी मा नरेंद्र नरड शिवसेना तालुका प्रमुख यांनी केलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक विविध सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत.
गावठाण परिसरातील नागरिक गेली 30 ते 40 वर्षापासून त्या भूखंडावर राहत असूनही त्यांच्या नावावर मालकी हक्काचे कुठलेही अधिकृत कागदपत्र नाही. यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, कर्ज योजना यांचा लाभ घेणे अशक्य झाले आहे. विशेषतः टिळक नगर, समता कॉलनी, कुर्झा, बोन्डेगांव व इतर वार्डमध्ये ही समस्या जास्त तीव्र आहे.
ब्रह्मपुरी शहरातील जनता कायम रहिवासी असून या क्षेत्रात असणाऱ्या मालमत्तेचा अजून पर्यंत सिटी सर्वे झालेला नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शासकीय पुरावे रेकॉर्ड ब्रह्मपुरी येथील संबंधित कार्यालयातून जनतेस उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्या जनतेस शासकीय व महसूल कार्यालयात अनेक प्रकारची अडचण निर्माण होत आहेत.शुल्क भरूनही रेकॉर्ड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांचे अनेक कामे रेंगाळत पडले आहेत.त्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. म्हणून लवकरात लवकर सिटी सर्व्हे करून रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा ही मागणी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची आखीव पत्रिका द्यावी, अन्यथा शिवसेना तालुका व शहर रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमोल माकोडे, डॉ संजय पारडवर , मिलिंद भणारे,आकाश शेंद्रे युवा सेना तालुका प्रमुख, गणेश लांजेवार, आशिष गांडलेवार व शिवसैनिक उपस्थित होते.















