prabodhini news logo
Home चंद्रपूर मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दलाच्या शिबिराचे आयोजन

मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दलाच्या शिबिराचे आयोजन

0
135

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महामाया बुद्ध विहार लाडबोरी येथे भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व, भारतीय बौध्दमाहासभा तालुका शाखा सिन्देवाही व भारतीय बौध्दमाहासभा ग्राम शाखा लाडबोरी च्या वतीने दोन दिवसीय समता सैनिक दलाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व यांनी ध्वजारोहण करुन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास कोसे हे होते तर मुख्य मार्गदर्शक आद अनिल मेश्राम मेजर, आद सिध्दार्थ बांबोळर डिव्हिजन आफिसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आद लोमेश खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस, आद भैय्याजी निमगडे कोषाध्यक्ष आद रमेश धोंगडे, आद मनिषा नागदेवते उपस्थित
आदर्शाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व आद मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
आद अनिल मेश्राम यांनी दोन दिवस समता सैनिक दलाच्या ५१ सैनिकाना प्रशिक्षण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here