वणवा लागला अचानक
पेटला गावात भरवस्तीत.
आजुबाजुचे शुष्क गवत
झाले खाक, भस्मसात.
कित्येक घरेही जळाली
वाचवायला जाऊ म्हणायची
संधी न कुणा मिळाली
आयुष्याची पुंजीही जळाली.
रहाते घर,जमवून काडी काडी
बांधलेले मेहनतीने ज्यानी त्यांनी.
डोळ्यांदेखत वणव्याने पेटले
जीव वाचवण्याची शिकस्त झाली.
मध्यभागी घरांच्या ढिग वस्त्रांचा
सामान, पैसा_अडका पेटला.
काही माणसांचा जीव गेला
होरपळ होऊन आगीत पेटत गेला.
नैसर्गिक संकटे ,न सांगता येतात
निसर्गास जपा कदाचित सांगत.
उध्वस्त होतो निसर्ग माणसांसह
भस्मसात होतो ,डोळ्यांदेखत.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.

