प्रशांत देशपांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क 88559970 15 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे रे रोड केबल स्टेड ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महारेलने अतिशय विक्रमी वेळेमध्ये येथील केबल स्टेड ब्रिजची उभारणी केली. 1910 साली बांधलेल्या या पुलाचे आयुष्य संपले होते, पूल अरुंद होता व यामुळे अनेक अडचणी होत्या. म्हणूनच महारेलने या ब्रिजच्या निर्मितीचे काम हाती घेतले. महारेलने अतिशय अडचणीच्या स्थितीत, वाहतुकीला कमीत कमी बाधा पोहोचवत या ब्रिजचे काम पूर्ण केले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महारेलचे अभिनंदन केले.
आपण 2016 साली महारेल कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायची जबाबदारी दिली. आतापर्यंत महारेलने 32 ब्रिजेसचे काम पूर्ण केले असून यावर्षी 25 ब्रिजेसचे काम पूर्ण होणार आहे. महारेलद्वारे अतिशय उत्तम तंत्रज्ञान वापरुन, गतिशीलतेने गुणवत्तापूर्ण काम केले जात आहे. तसेच, ब्रिज उभारणी करताना त्याच्या सौंदर्यीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. नागपूरमध्येदेखील अशाप्रकारचे 10 पूल पूर्ण झाले आहेत. त्यांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे, असे
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. प्रवीण दरेकर, आ. मनिषा कायंदे, महारेलचे महाव्यवस्थापक व इतर मान्यवर उपस्थित होते.

