prabodhini news logo
Home ठळक बातम्या समाज कल्याण विभागाचा निधी इतर खात्यात वळविण्यात आल्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

समाज कल्याण विभागाचा निधी इतर खात्यात वळविण्यात आल्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
143

प्रणय बसेशंकर
विशेष तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज वणी

वणी: राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा.बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्ष मा.माधवराव गायकवाड व डॉ शांताराम कंराडे, विदर्भ अध्यक्ष मा. संबा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ,वणी जिल्हा यवतमाळ च्या वतीने दिनांक 14/5/2025 रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दादा अजित पवार, समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना उपविभागीय अधिकारी साहेब,वणी यांच्या मार्फत समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र वळवण्यात येऊ नये म्हणून निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष महेश लिपटे सर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना वणी शहर अध्यक्ष प्रकाश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता विनोद ढेरे, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here