prabodhini news logo
Home चंद्रपूर हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

0
86

चंद्रपूर – केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2025-26 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता बरगढ (ओडिशा) करीता 13+1 (या व्यतीरीक्त वेंकटगिरी करीता 2 जागा कॉन्सुलिंगच्या घेणेबाबत नमुद आहे.) प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग तर्फे, नागपूर /सोलापूर/ मुंबई छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज 10 जून 2025 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज 10 जून पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी कळविले आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्याग,नागपूर, प्रशासकिय इमारत क्र.2, 8 वा माळा,”बी” विंग, सिव्हील लाईन्स ,नागपूर 440001 दुरध्वनी क्रमांक-0712-2537927 यांचे कडून प्राप्त करून घ्यावे. तसेच अर्जाचा नमुना व विहीत पात्रता या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्याचे प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here