
ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद
कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतिहास समजून घेऊन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यासंदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूरया ठिकाणी सामूहिक वाचन करण्यात आले या उपक्रमास जनार्दन गायकवाड (जिल्हाध्यक्ष), महाबोधी पद्माकर (कोल्हापूर शहर महासचिव), अमित नागटिळे (शहराध्यक्ष, युवा आघाडी), नितिन कांबळे (करवीर तालुका अध्यक्ष), अरुण जमणे (जिल्हा सचिव), प्रकाश कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. आकाश कांबळे (जिल्हा महासचिव, युवा आघाडी), तसेच सचिन कांबळे, समीर जमादार, विकास कांबळे, रतन कांबळे, निलेश कांबळे, अक्षय मोहिते, योगेश कांबळे, निशिकांत कांबळे, अशोक कोरगावकर आणि करवीर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास नव्या दृष्टीकोनातून करून समाजामध्ये विचारप्रवर्तन घडवून आणणे हा आहे. यावेळी सर्व नागरिक, कार्यकर्ते व अभ्यासक यांनी या सामूहिक वाचन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.















