Prashant Ramteke chief Editor – साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाच्या वतीने दिनांक १८ मे २०२५ रोजी नभांगण लॉन्स वनवैभव कॉलनी समोर वडाळा – आणि रोड इंदिरा नगर नाशिक येथे दुसरे राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न झाले.
या कविसंमेलनाचे उद्घाटक डॉ.विनोद जाधव मुंबई , सहउद्घाटक अशोकजी टेंभूर्णीकर नागपूर , डॉ. अनिता बेंडाळे, नाशिक तर अध्यक्षस्थानी वाल्मिक सोनवणे नाशिक, हे होते.
स्वागताध्यक्ष समूह संस्थापिका कल्पना टेंभुर्णीकर नागपूर, प्रा.नानाजी रामटेके , आरमोरी जिल्हा गडचिरोली यांनी उपस्थीत मान्यवरांचे स्वागत केले
प्रमुख अतिथी म्हणून माला मेश्राम नवी मुंबई ,डॉ.संजय जाधव , करुणासागर पगारे, राजश्री सुदाम टेंभुर्णी,सुरेश भडके,मनिष बागुल,मनिष जाधव ,भूषण जाधव ,श्रीकांत गायकवाड,प्रकाश दुलेवाले नागपूर , शोभा वेले,नागपूर संजय घंगारे,तुषार नेमाडे नाशिक , सुमनताई जिरोणेकर नांदेड, डॉ.जिरोणेकर नांदेड इत्यादी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात कविसंमेलन उद्घाटन ,तथागताची वाणी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ,आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात कविसंमेलन आयोजित करण्यात आले.दुसऱ्या सत्रात कविसंमेनाध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.यात राज्यातील विविध भागातून आलेल्या जवळपास पन्नास साहित्यिकांनी आपली कविता सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समूह प्रशासिका निता बागुल नाशिक,मानसी बर्वे नाशिक ,पुष्पा रामटेके आरमोरी ,रंजना शहारे मुंबई , वृंदा टेंभुर्णे,नाशिक आदींनी मोलाचे सहकार्य केले.
पहिल्या सत्राचे संचालन विद्या पंडीत डोंबे, ठाणे आणि छाया जांभुळे ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर तर दुसऱ्या सत्राचे संचालन समाधान दिनकर लोणकर हिंगोली यांनी केले.प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय कल्पना टेंभूर्णीकर समूह संस्थापिका तर आभार प्रा.नानाजी रामटेके समूह संस्थापक साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र यांनी मानले.

