prabodhini news logo
Home घुग्घुस पाणी हे प्रत्येक कुटुंबाची गरज कुणी ही वंचित राहू नये : राजुरेड्डी

पाणी हे प्रत्येक कुटुंबाची गरज कुणी ही वंचित राहू नये : राजुरेड्डी

0
124

आता शहरात चार वॉटर टँकर द्वारा पाणी पुरवठ्याला सुरुवात

गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा हा देशात सर्वात जास्त उष्णता असलेला जिल्हा असून या जिल्ह्यातील घुग्घूस शहर हा प्रचंड उष्ण शहर असून उन्हाचा तडाखा हा जीवघेणा व असहाय्य झालेला आहे.
शहरात पाण्याचा प्रचंड असा दुष्काळ झालेला असून पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

राजुरेड्डी हे गेल्या बारा वर्षांपासून शहरात आपल्या दोन वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करीत आहे.
मात्र पाण्याची टंचाई लक्षात घेता तसेच नागरिकांना व विशेषतः आई बहिणींना पाण्यासाठी होत असलेला त्रास लक्षात घेता राजुरेड्डी यांनी 19 /05/2025 पासून अजून दोन वॉटर टँकर असे एकूण चार वॉटर टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठ्याला सुरुवात केली आहे.

शहरात ज्यांना कुणाला पाणी लागेल त्यांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात येऊन आपल्या नावाची नोंद करावी त्यांना घरपोच पाणी पुरवठा करण्यात येईल असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

नवीन वॉटर टँकरचे विधिवत उदघाटन करून त्यांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, तालुका सचिव विशाल मादर, अनिरुद्ध आवळे, शेख शमिउद्दीन, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, एस्सी तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा,बालकिशन कुळसंगे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, संध्या मंडल, सरस्वती कोवे, वैशाली पोपटकर,जोया शेख,दिपक पेंदोर,सुनील पाटील, कुमार रुद्रारप, देव भंडारी, शहंशाह शेख,आयुष आवळे, नाणी मादर, साहिल आवळे, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व सदस्यगन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here