prabodhini news logo
Home ठळक बातम्या खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

0
154

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – जिल्हा नियोजन सभागृह गडचिरोली येथे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदवजी किरसान यांच्या अध्यक्षतेखाली दिशा- जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकी दरम्यान खासदार डॉ.नामदेवजी किसान यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेऊन लवकरात लवकर जनतेचे प्रश्न व विकास कामे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदासजी मसराम, जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here