जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – नंदगोपाल फाऊंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर रविवार दि. २५ मे २०२५ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयएमएभवन, वरठी रोड येथे करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तपेढ्यांमध्ये नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यात मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होत असते. परिणामी अपघातग्रस्त, गरोदरमाता, शस्त्रक्रियेतील रुग्ण यांच्यासाठी रक्त उपलब्ध करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे भंडारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत -जास्त तरूण, जागृत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करावे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार व आयएमए यांनी केले आहे.

