
चंद्रपूर येथील हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी ह्या संस्थेला स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वाॅरियर्स पुरस्कार ह्या पुरस्काराची नुकतीच दै. मुंबई तरुण भारत आणि महा एमटीबीकडून घोषणा झाली आहे, त्यांनी संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे यांना इमेल द्वारे पुरस्काराची माहिती कळविण्यात आली होती, हा पुरस्कार 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे.
दै. मुंबई तरुण भारत आणि महा एमटीबीकडून गेली दहा वर्ष वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वाॅरियर्स पुरस्कार दिला जातो.
सन्मानचिन्ह आणि सहयोग निधी, असे पुरस्काराचे स्वरुप असते.
यंदाच्या पुरस्कारचे मुख्य प्रायोजक एसएफसी एन्व्हार्यमेंटल टेक्नोलाॅजीस् आहेत.
एकूण ११ श्रेणींमध्ये १५ पुरस्कार देण्यात येतात.
काॅन्झर्वेशन एक्टीव्हिजम या श्रेणीमध्ये वन किंवा वन्यजीव संवर्धनाचे काम हे सकारात्मक एक्टीव्हिजमच्या माध्यमातून करणाऱ्या संस्था वा व्यक्तीची निवड केली जाते.
केवळ विरोधाला विरोध न करता, उपाययोजनात्मक बाबींवर वन किंवा वन्यजीव संवर्धनाचे काम करणाऱ्यांची निवड या श्रेणीमध्ये होते.
मुंबई तरुण भारतअतंर्गत वन अधिकारी, वन्यजीव संशोधक, महाएमटीबीच्या वाईल्डलाईफ रिपोर्टिंग डिव्हिजनचे प्रतिनिधी यासंदर्भात निर्णय घेतात.
हॅबीटॅट्स काॅन्झर्वेशन सोसायटी – चंद्रपूर
चंद्रपूर येथील ‘हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी’ ही संस्था पायाभूत प्रकल्पांमधील वन्यजीव उपशमन उपयोजनांकरिता प्रयत्नशील आहे. राजुरा-बल्लारशाह-लक्कडकोट आणि कोरपान ते राजुरा या रस्त्यावर वन्यजीवांसाठी उपशमन योजना अंमलात आणण्यासाठी संस्थेकडून सरकारसोबत समन्वय साधला आहे. याशिवाय ज्याठिकाणी वन्यजीवांसाठी उपशमन योजना अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. त्याठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या वन्यजीवांच्या शास्त्रीय नोंदी ठेवण्याचे ते काम करत आहेत. चंद्रपूरमधील वाघांच्या मॉनिटरिंगसाठी ते वन विभागाला मदत करत आहेत. तसेच मानव-वन्यजीव संघर्षा दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, वनविकास महामंडळ, चंद्रपूर, वनविभाग प्रादेशिक, चंद्रपूर यांच्या सोबत मिळून कार्य करत आले आहे, वन्यजीवांचे भ्रमनमार्ग कसे सुरक्षित करता येईल, ह्याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, त्या दृष्टिकोनानेच वन्यजीवांच्या हालचालीवर नजर ठेवून,वन्यजीवांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष खुणा आढळून आल्यास त्याच्या नोंदी ठेवून, रस्ते अपघातात वन्यजीवांच्या नोंदी ठेवून, नकाशावरती आणून वन्यजीव कुठले मार्ग वापरत आहे हे लक्षात येतात व वन्यजीवांचे रस्ते अपघातात जाणारे जीव कसे कमी करता येईल, ह्यावर उपाय योजना ठरवून ते अमलात आणत पर्यंत पाठपुरावा करणे हे सातत्याचे हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी’ संस्थेचे कार्य आहे, तसेच शहरालगतच्या वन्यजीवांवर कॅमेरा ट्रॅप च्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते, वन्यजीव सप्ताहात व इतर दिवशी सुद्धा शाळा कॉलेजेस मध्ये वन्यजीवांचे भ्रमनमार्ग, वन्यजीवांचे महत्व, मानव-वन्यजीव संघर्ष ह्या विषयावर जनजागृती कार्यक्रम करण्यात येते. हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी’ सातत्याने हे कार्य करत राहील, केलेल्या कामाची पावती म्हणून पुरस्कार, सन्मान होत असेल तर आणखी नवीन ऊर्जेने, वन्यजीव संवर्धनासाठी संस्था नेहमी तत्पर राहिल.















