prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जगवा,लावा...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जगवा,लावा एक तरी वृक्ष

0
168

वृक्ष धरतीचा श्वास
निसर्गाचा आधार
मानवा वाचवा, लावा
एक तरी वृक्ष….

वृक्ष आमचे सखा सोयरे
वृक्षविना आमुचे जीवन कोरडे
मानवा वाचवा, लावा
एक तरी वृक्ष….

छाया देऊन दुसऱ्यास
उभा स्वयं ऊनात
मानवा वाचवा, लावा
एक तरी वृक्ष….

फळ,फुल, छाया, हवा
देऊन सदैव मानवा
परोपकारी,निस्वार्थी
वृक्षासम बनवा स्वतःला…

मानवा वाचवा, लावा
एक तरी वृक्ष…..

सौ अर्चना सातपुते
समाजसेविका शिक्षिका
चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here