
रिमझिम सरीत भिजताना
मन भिजून ओले होते
झाडे दारी झुलताना
ओठावर गाणे येते
झाडेही गाती गाणे
आनंदाने ती झुलती
रंग मौसमी गाण्याचा
पानेही झोके घेती
कापती कुणी का झाडे
पाणीही दुषीत करती
अन्याय नको निसर्गावर
आपला आहे सोबती
लावू, आपणही झाडे
छान वाढवू झाडांना
पक्षी बांधतील घरटे
मिळतील फळे मग त्यांना
मैत्र जोडू निसर्गाशी
मार्ग आपल्या जगण्याचा
एकजूट होऊ आम्ही
भार घेऊ रक्षणाचा …
गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा















