prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन

0
111

जपू निसर्गाचा ठेवा
तोच खराखुरा मित्र
पाहू पर्यावरणाचे
संवर्धन हेच चित्र..१

पशुपक्षी वृक्ष,लता
आहे निसर्ग सोबती
करु पर्यावरणाचे
संवर्धन या सगंती…२

नका करू वृक्षतोड
ऋतुचक्र फिरतील
ऊन पावसाचा जोर
जीवजंतू संपतील…३

निसर्गाची किमया ही
अप्रतिम नवलाई
सुख समृध्दी लाभता
सुखावते धरा आई…४

फळे फुले भाजीपाला
देई आम्हांस निसर्ग
मनी भासे समाधान
नको तयाचा विसर्ग…५

सौ. रेखा.भा.मालपुरे
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here