prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन

0
121

जागतिक पर्यावरण दिनी
राखू निगा पर्यावरणाची
वृक्षरोपण करुन आम्ही
सुंदरता वाढवू सृष्टीची

राखू निगा पर्यावरणाची
जगू जीवन आनंदाने
झाडे लावू झाडे वाढवू
निसर्ग वाचवू संवर्धनाने

पर्यावरणाच्या रक्षणार्थ
झाडांचे तोडणे थांबवावे
झाडाची निगा राखून
आपले कर्तव्य निभवावे

व्रत निसर्ग संवर्धनाचे
मंत्र असे सुखी जीवनाचा
त्याचे आम्ही पालन करुन
मळा फुलवू चैतन्याचा

पर्यावरणाचे रक्षण करणे
गरज आहे आज काळाची
प्रत्येकाने लक्षात घेऊन
काळजी घ्यावी भविष्याची

डाॅ. सौ. रेखा पौडवाल गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here