वनविभागाची मोठी कारवाई.
विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
8830554583
अहेरी – सागवान इमारती लाकडांची वाहतूक करुन एका फर्निचर मार्टमध्ये अवैधरित्या साठवणूक केल्याप्रकरणी चार लाख रुपयांचे सागवान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जप्त केले.
अहेरी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी गस्तीवर असताना आलापल्ली वन विभागाअंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील उपक्षेत्र इंदाराम येथील अवैध सागवान इमारती
लाकडांची वाहतुक करून इंदाराममधील एका फर्निचर मार्टमध्ये साठवणुक केल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन इंदारामचे क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व वनमजुर यांनी श्रीनिवास फर्निचर माट येथे धाड टाकली. यावेळी फर्निचर दुकान व घराची झडती घेतल्यानंतर ४.९६६३ घन मिटरचे ३ लाख ९१ हजार ५०९ रुपयांचे २५८ नग सागवान माल साठवून ठेवल्याचे आढळून आले. सदर माल हस्तगत करण्यात आला असून आरोपी श्रीनिवास कोतावडलावार हा फरार आहे. या आरोपीविरोधात वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे यांच्या मार्गदर्शनात इंदारामचे क्षेत्रसहाय्यक एस. टी. सहारे करीत आहेत. ही कार्यवाही आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलीया, सहाय्यक वनसंरक्षक शिशुपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाली व अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक एस. टी. सहारे, इंदारामचे वनरक्षक एच. जी. कुमरे, व्यंकटरावपेठाचे वनरक्षक जी. एस. पस्पुनुवार, मोसमचे वनरक्षक व्ही. एस. मडावी आदींनी केली…

