prabodhini news logo
Home अमरावती धनगर समाजाच्या वतीने डॉ. जयप्रकाश बनकर यांचा सत्कार

धनगर समाजाच्या वतीने डॉ. जयप्रकाश बनकर यांचा सत्कार

0
242

ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

अमरावती – दि. १४/०६/२०२५ नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशनच्या कार्यक्रमात डॉ. जयप्रकाश बनकर यांनी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान मिळवला. त्यांनी उत्तम कामगिरी केल्याचे गांभीर्य लक्षात घेताच वरिष्ठ डॉ. बायस्कर, डॉ. देशमुख यांनी डॉ. बनकर यांची ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्ष पदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीबाबत विविध संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी डॉ. जयप्रकाश बनकर यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांची कामगिरी इतर रुग्णालयांसाठी एक प्रेरणादायी ठरली आहे. त्यांचा समाजकार्यात देखील विशेष सहभाग असतो आणि ते गरीब व गरजू रुग्णांवर निःशुल्क उपचार नेहमीच करत असतात. याच बाबींचे औचित्य साधून तसेच डॉ. जयप्रकाश बनकर यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी निखिल घूरडे, प्रवीण भागवत, गजानन सरोदे, भाष्करराव ढेवले, दिनेश गादे, मनोज कचरे, अमित महात्मे, अनुज सरोदे, नाविन्य भागवत आदी धनगर समाज बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here